आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल नुकताच जाहीर‎:गांधी संस्कार परीक्षेतील‎ यशस्वीतांचा गौरव‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक‎ शाळेत गांधी रिसर्च फाउंडेशन‎ आयोजित गांधी विचार संस्कार‎ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर‎ झाला. यात धनश्री पाटील, श्याम‎ बडगुजर या विद्यार्थ्यांना मेडल,‎ प्रमाणपत्र तर शाळेला मानचिन्ह‎ देण्यात आले. तर सहभागींना‎ प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जैन‎ इरिगेशनचे अशोक जैन यांच्या‎ वाढदिवसानिमित्त ६१ पुस्तकांची भेट‎ शाळेच्या ग्रंथालयास देण्यात आली.‎ या वेळी गांधी विचार संस्कार‎ परीक्षेचे समन्वयक गिरीश‎ कुलकर्णी, मुख्याध्यापक हेमराज‎ पाटील, प्राचार्य उमेश इंगळे,‎ विश्वजित पाटील, वैशाली पाटील‎ उपस्थित होते. सचिन गायकवाड‎ यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...