आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदन:आता शवविच्छेदनाची जबाबदारी जीएमसीच्या डॉक्टरांचीच असणार ; ड्युटी शेड्युल जाहीर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता न्यायवैद्यकशास्त्र विभागातंर्गत जीएमसीच्या डॉक्टरांची शवविच्छेदन अर्थात पीएम करण्याकरिता ड्युटी लावण्यात येणार असून बुधवारपासून हा बदल झाला आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या यासाठी ड्युटी लावण्यात येत होत्या. याकरिता जीएमसीत १० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात करार करण्यात आला असून जीएमसीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर देखील उसनवारी तत्वावर काम करत आहे. शवविच्छेदनाची संपूर्ण जबाबदारी ही न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांची आहे; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे दोनच डॉक्टर असल्याने याठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांची ड्युटी लावण्यात येत होती. दररोजचे काम सांभाळून पुन्हा पीएमची ड्युटी करताना अनेक अडचणी येत असत त्यातच या विभागातील अधिक माहिती नसल्याने अनेकदा न्यायालयात देखील उत्तरे देताना त्रास होत असे हा ताण कमी करावा याकरिता सिव्हिलच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन दिले असता त्यांनी नवीन भरती करत जीएमसीच्या डॉक्टरांच्या ड्युटी लावण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार १ जूनपासून हे बदल करण्यात आले असून १५ दिवसांचे शेड्युल तयार केले आहे. यात नवीन रुजू झालेल्या ३ महिला व ७ पुरुष डॉक्टरांचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी पत्र काढले आहे. भोईटेनगर उड्डाणपुलाचा विषय पुन्हा... अन्यथा आंदोलन : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल. त्यात रेल्वे, मनपाचे अधिकारी उपस्थित असतील, असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले. आठवडाभरात भूसंपादन व रस्त्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन करु असा इशारा सागर पाटील, संदेश भोईटे, भूषण परदेशी, डी. सी. पाटील, गुलाब चौधरी, गणेश वाणी, महेश चिंचोलकर, हितेश शहा, नितीन नेवेंनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...