आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:जीएमसी च्या अधिष्ठातापदी डॉ. गिरीश ठाकूर येणार

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे वर्षभरापूर्वी सोपवण्यात आला होता. प्रशासकीय कारणास्तव हा कार्यभार आता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील प्रा.डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी रात्री उशिरा आदेश काढण्यात आले.

२६ ऑगस्ट २०२१ रोजी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. फुलपाटील यांची जीएमसीत अधिष्ठातापदी अतिरिक्त कार्यभार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, शरीररचनाशास्त्र विभागाचे पद रिक्त नाही, असे डॉ. रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दोन वेळा पत्राद्वारे कळवले होते.

त्यानंतरदेखील डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. रामानंद यांच्याकडे सोपवला हाेता. आता डॉ. रामानंद यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील औषधशास्त्र विभागात आपल्या मूळपदी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...