आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौंटुबिक वाद:विभक्त पत्नीच्या माहेरी जात पेट्रोल टाकून पेटवले; पत्नीचा मृत्यू, 63 वर्षीय पतीही 55 टक्के भाजला

धरणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले होते, तिचा दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. वृद्ध पतीही ५५% भाजला असून त्याचीही प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास हिंगोणे बुद्रूक (ता.धरणगाव,जि.जळगाव) येथे घडली होती.

रिंगणगाव (ता.एरंडोल) येथील रहिवासी संतोष भिल (६३) व त्यांची पत्नी मीराबाई भिल (५५) यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू होता. त्यामुळे दोघेजण वेगवेगळे राहत होते. मीराबाई हिंगोणे बुद्रुक येथे माहेरी आल्या होत्या. रविवारी रात्री अडीचला संतोष भिल हिंगोणेत आला. दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर संतोषने मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या वेळी स्वत:वरही पेट्रोल उडाल्याने संतोषच्या कपड्यांनीही पेट घेतला. या घटनेत मीराबाई गंभीरपणे भाजल्या गेल्या तर संतोष भिल ५५ टक्के भाजला गेला. उपचारादरम्यान सोमवारी मीराबाईचा मृत्यू झाला.