आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण गुढी:अर्ध्या किलोहून अधिक वजनाची जळगावात सुवर्ण गुढी, दोन फुटी चांदीची काठी, चांदीचाच कलश व सोन्याच्या दागिन्यांसह 52 शिक्क्यांचा वापर

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’ने आवाहन केले आणि जळगावातील सराफी पेढीने यंदाचा गुढीपाडवा सुवर्ण गुढी उभारून सोन्याचा केला आहे. अर्ध्या किलोहून अधिक सोन्याचे दागिने व शिक्क्यांसह चांदीच्या काठीवर आणि चांदीच्याच कळसाचा उपयोग करून उभारलेल्या या गुढीचे सोने बाजारातील मूल्य २८ लाख रुपयांहून अधिक आहे.

आर.सी.बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनाेहर पाटील यांनी आपल्या एचआर विभागातील सहकारी महेश पाटील व श्रद्धा पाटील यांच्या मदतीने ही अनाेखी गुढी साकारली. त्यासाठी त्यांना तब्बल साडेतीन तासांचा अवधी लागला.

अशी बनली सोन्याची गुढी
वजन (ग्रॅममध्ये) किंमत

राणीहार ४७.४७० २६१०००
लक्ष्मीहार १९.८७१ १,०४,५००
माेहनमाळ ३४.३७० १,८५,६००
तोडे ३५.००० १,९२,५००
चेन २ नग ३०.००० १,६०,१००
शिक्के ३४०.००० १८,२०,०००
कडे २ नग १६.००० ८६,४००

चांदीची काठी (२३५) *चांदीचा तांब्या (५२ ग्रॅम) दाेन्ही मिळून २८७ ग्रॅम (किंमत २१ हजार रुपये) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...