आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चकाकले:सोन्याची पुन्हा उसळी, गाठला 55,800 रुपये दर, तर चांदी 71 हजार रुपयांवर

जळगाव3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव : चांदी एकाच दिवसात 3500 ने महाग

महिनाभरापूर्वी ५० हजारांच्या घरात असलेल्या सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा दमदार उसळी घेतली आहे. सुवर्णनगरी जळगावात बुधवारी सोन्याने ५५ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीने ७१ हजार रुपये किलोचा उच्चांक गाठला. गेल्या ५ दिवसांतच चांदीचे भाव पाच हजार रुपयांनी वधारले आहेत. सोने एका दिवसात ९०० रुपये तर चांदी ३५०० रुपयांनी महागली आहे.

जागतिक बाजारात मौल्यवान धातूंची जोरदार उचल, ट्रेड वाॅर, भौगोलिक-राजकीय अनिश्चितता, कमकुवत डाॅलर, कोविडमुळे प्रेशियस मेटलच्या दरात तेजी आली. सोन्याने गुंतवणूकदारांना एका महिन्यात तोळ्यामागे ६ हजार रुपये तर चांदीने किलोमागे ११ हजार रुपयांचा परतावा दिला आहे.

चांदी लाखापर्यंत जाणार

चांदीच्या दरांतील ही चमक पुढेही अशीच कायम राहिली तर पहिल्या टप्प्यात ८० हजार व दुसऱ्या टप्प्यात ती १ लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवला आहे.