आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव बाजारपेठेत बुधवारी ५७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम दर असलेले साेने एकाच दिवसात ६०० रुपयांनी वाढून गुरुवारी ५८,४०० रुपयांवर पोहोचले. मुंबई सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा दर ५८,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. देशात गेल्या आठवड्यात ३ ते ३,५०० हजार रुपयांनी सोने महागले आहे. या दरवाढीमागे २ अमेरिकी बँका बुडणे, युराेपातील ५ बँका बंद पडणे व स्विस क्रेडिट स्वीच हाेण्याबाबतची अफवा ही प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीच्या दाेनच दिवसांत साेन्याच्या प्रति ताेळ्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली. पाठाेपाठ आंतरराष्ट्रीय घडामाेडींनी पुन्हा साेन्याच्या दरात तेजी येऊन पंधरवड्यात साेन्याच्या दरात ३ हजारांची वाढ नाेंदवली गेली.
दिव्य मराठी एक्सप्लेनर
मागणी वाढली की दरही वाढतात
बाजारपेठेत पत सांभाळण्याची जबाबदारी बँकांवर असते. अशा प्रमुख बँकाच बंद पडल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम हाेताे. त्यासाेबतच ग्राहकांचा विश्वास कमी हाेताे. अशा स्थितीत त्वरित मूल्यात रूपांतरित हाेणारी वस्तू म्हणून साेन्याकडे पाहिले जाते. त्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की दर वाढतात. या सिद्धांतानुसार साेन्याच्या दरात वाढ झालेली आहे. साेन्याचे दर आगामी काळात चढेच राहतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
ही आहेत प्रमुख कारणे...
{ अमेरिकेतील दाेन बँका बुडाल्या आहेत. तिसरीही बँक बुडण्याच्या मार्गावर आहे.
{ त्यापूर्वीच युराेपातील पाच बँका डबघाईस आल्या आहेत.
{ स्विस बँकेचे क्रेडिट स्वीच झाल्याची रुमर (अफवा) जागतिक पातळीवर पसरली आहे.
{ एकूणच जागतिक अर्थव्यवस्था विचित्र स्थितीत पाेहाेचल्याने जागतिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.