आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाच्या दरात होणार वाढ:अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर वाढले सोन्याचे दर; तर साेने आठवडाभरात 55 हजारांचा टप्पा गाठणार

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्णबाजार शनिवारी बंद होईपर्यंत प्रतितोळा 500 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. सोमवारी मात्र, 400 रुपयांची घसरण होऊन भाव 51 हजार 950 रुपयांवर आले. दरम्यान, आगामी आठवडाभर हे दर असेच (रोज 300 ते 400 रुपये) वाढते राहिले तर ते 55 हजारांचा टप्पा गाठतीलसोने आठवडाभरात 55 हजारांचा टप्पा गाठणार अशी शक्यता सुवर्णपेठेतील जाणकारांनी वर्तवली आहे.

अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोने अक्षय संचय राहून वाढत जाते असा समज आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला वेगळे महत्त्व मानले जाते. शनिवारी दरात 500 रुपयांची वाढ होऊन सोने 50 हजार 350 रुपये प्रतितोळा झाले होते. ते सोमवारी पुन्हा 400 रुपयांनी घसरून 51 हजार 950 रुपये झाले.

...असा असणार सोन्याचा भाव
पुढील आठवडाभर सोन्याच्या दरात सतत 300 ते 500 रुपयांची चढउतार होत राहील. असेच दर वाढत जाऊन प्रतितोळा 55 हजार रुपये या उच्चांकी दरावर पुन्हा एकदा सोन्याचे दर पोहोचण्याची शक्यता आहे. अजय ललवाणी, अध्यक्ष: शहर सराफ असोसिएशन, जळगाव

बातम्या आणखी आहेत...