आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:दहा फुटांच्या खोलीतही खेळता येईल गोल्फ! धुळ्यातील प्रा. बाळकृष्ण तांबे यांची अनोखी रचना

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्फ या क्रीडा प्रकाराची सुविधा केवळ मोठ्या शहरात आहे. तसेच या खेळासाठी जागाही जास्त लागते. ही बाब लक्षात घेऊन शहरातील प्रा. बाळकृष्ण तांबे यांनी या खेळाची रचना बदलली आहे. त्यामुळे हा खेळ आता १० बाय १२ फुटांच्या खोलीतही खेळता येऊ शकतो. गोल्फला कमीत कमी ५० ते २०० एकर जागेची आवश्यकता असते. धुळ्याचे रहिवासी व पुण्यात स्थायिक झालेेले प्रा. बाळकृष्ण तांबे यांनी गोल्फची रचना बदलली आहे. त्यामुळे गोल्फ १० बाय १२ फूट आकाराच्या खोलीत खेळता येईल. त्यातून जागेसह वेळेची बचत होईल.

प्रा. तांबे यांनी विकसित केलेले गोल्फ असे...
1.
पारंपरिक गोल्फ खेळात ९ किंवा १८ होल्स असतात. सुधारित गोल्फमध्ये दशमान पद्धतीनुसार १० च्या पाढ्यात होल आहे. त्यामुळे गुणांची संख्या मोजणे अधिक सुलभ होते.
2. एका रूममध्ये मॅट टाकून त्यासमोर एक जाळी बसवावी लागते. त्या जाळीतील होलला नंबर दिले आहे. मॅटवर एक टी आकार ठेवून त्यावर चेंडू ठेवून तो स्टिक्सने समोरील जाळीतील होलमध्ये टाकावयाचा आहे.
3. उभी असलेली जाळी आडवी करूनही हा खेळ खेळता येऊ शकतो. गोल्फ स्टिक परदेशातून मागवावी लागते. या स्टिकचे स्थानिक स्तरावर उत्पादन करण्याचा प्रा. तांबे यांचा प्रयत्न आहे.

खेळांचे ६ पेटंट : प्रा. बाळकृष्ण तांबे यांनी विविध पारंपरिक खेळांत बदल केले आहे. त्यांनी खेळांचे ६ पेटंटही घेतले आहेत. त्यात १०० घरांचे बुद्धिबळ, मन गणक संच, सागरगोटे आदी खेळांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...