आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर:खुशखबर! सुरत-भुसावळ पॅसेंजर उद्यापासून, आरक्षणही झाले सुरु ; व्यवसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्यांची सोय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम रेल्वेने कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद केलेली रात्रीची सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी ८ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची माेठी गैरसोय दूर होणार आहे. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सुरत स्थानकात पोहोचणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

बातम्या आणखी आहेत...