आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवापूर:पानबारा गावाजवळ ट्रक व इनोवा कारचा भीषण अपघात, जळगाव येथील गोसेवक नरेश खंडेलवाल यांचा मृत्यू

अपघातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील पानबारा नजीक गुरूवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रक व इनोवा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात जळगाव येथील गोसेवक नरेश खंडेलवाल (वय65) यांचे निधन झाले आहे. तर, इतर तीन जण जखमी झाले आहेत.

विसरवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार (क्रमांक एम एच 19 टीव्ही 6310) सुरतहून जळगावकडे जात असताना धुळ्याकडून सुरतकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक (सी जी 04 एच वाय 7025)शी दुभाजकवरून रस्ता क्रॉस करताना अपघात झाला. या अपघातात जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोसेवक तथा भारतीय नरेंद्र मोदी संघाचे अध्यक्ष नरेश खंडेलवाल यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेले चालक संजय, विजय जैन, एक व्यक्तिचे नाव माहित नाही असे चार जण होते. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे. अपघात होताच पानबारा गावातील ग्रामस्थ तसेच शेतामध्ये काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावून आले व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचार केले. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 108 रूग्णवहिकेतून रवाना करण्यात आले आहे.

विसरवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटीलसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती जाणून घेतील.महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याने अपघात

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असल्याने या अपघातात अनेकांचे बळी जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकर करावे अशी मागणी स्थानिकांनी ग्रामस्थांनी केली आहे.