आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा परिषदेला उपलब्ध निधी खर्च करण्यासाठी तसेच जमाखर्चाचा ताळमेळ पूर्ण करण्यासाठी 21 एप्रील पर्यंतची मुदत दिली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेला निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. 106 कोटी निधी अखर्चित होता. हा निधी परत जाण्याची भीती होती. मात्र, शासनाने जिल्हा परिषदेला मुदत वाढवून दिली आहे.
20 कोटी रुपयांची बिले
जळगाव जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेला निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. त्यातच फंड मॉनिटरिंग सिस्टिम पोर्टल डाऊन असल्याने प्राप्त बिलांच्या अनुषंगाने खर्च करण्याची गती मंदावली होती. सध्यस्थितीत जिल्हा परिषदेकडे 20 कोटी रुपयांची बिले प्राप्त झाली आहेत. बिले हातात असताना सिस्टीममध्ये टाकण्याचे राहून गेल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शंभर टक्के निधी खर्च करण्याबाबत सर्व विभागांना सूचना दिल्या होत्या. मार्च महिन्यापाच्या सुरूवातीपासून प्रत्येक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉ. आशिया विभागप्रमुखांच्या बैठकी घेत आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांनीही अर्थ विभागात कामाला गती दिली.
ऑनलाईन प्रणाली ठप्प
प्राप्त बिलांच्या अनुषंगाने उपलब्ध निधी खर्च करून जमा व खर्चाचा ताळमेळ बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच ऑनलाईन प्रणाली ठप्प झाली होती. निधी परत जाण्याच्या मार्गावर असतानाच राज्य शासनाने ६ एप्रिलला एक परिपत्रक जारी करून जमा व खर्चाचा ताळमेळ पूर्ण करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदत दिली.
आता शिल्लक रुपये खर्च करण्यासाठी वाढीव वेळ मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी अर्थ विभागात धावपळ सुरू आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व लघुसिंचन विभागाची जास्त बिले प्राप्त झाली आहेत. आता वाढीव मुदतीत आणखी जास्त बिले तयार करुन पेमेंट वाटपाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.