आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी मिनी मंत्रालयाची:जि.प. निवडणुकीत चालेल भाजप अन‌् शिंदेसेनेचा पॅटर्न ; मार्चपूर्वी निवडणुकीचा अंदाज

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रखडलेले आरक्षण, गटरचना बाबतच्या सतत भूमिका बदलत असल्याने गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडली आहे. आता मार्चपूर्वी ही निवडणूक हाेण्याचा अंदाज बांधला जात असून जिल्ह्यात या निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेची युती हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा दूध संघात या दाेन्ही पक्षाच्या नेत्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळल्याने हाच पॅटर्न आता जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्ये दिसणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत यापूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती राहिली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जे सदस्य निवडून आले आहेत, ते सर्व सदस्य शिंदेसेनेच्या चार आमदारांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. अन्य ठिकाणी भाजपचे तर चार आमदारांच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेचे सदस्य हाेते. हाच फाॅर्म्युला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन भाजप-शिंदेसेनेच्या पॅटर्नमध्ये असेल. त्यामुळे ही युती गृहीत धरून शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. जिल्हा दूध संघात दाेन्ही पक्षांनी एकत्रितपणे पॅनल केले हाेते.

शिंदेसेनेच्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात भाजपचे सदस्य नाहीत. त्यामुळे शिंदेसेनेसाेबत युती करण्यास भाजपच्या इच्छुकांचा विराेध नाही. तर जिल्ह्यात अन्य ठिकाणी शिंदेसेनेच्या आमदारांचे कार्यक्षेत्र नसल्याने त्यांच्या इच्छुकांनाही भाजपसाेबतच्या युतीला विराेध नाही. उलटपक्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रिंगणात उतरल्यास भाजप साेबत असणे शिंदेसेनेच्या फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून निवडणुकीचा हाच फाॅर्म्युला कायम केला जाण्याची शक्यता राजकीय गाेटातून व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...