आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव झेडपीसमोर दिव्यांगाचा थाळीनाद:निधी वाटपात ग्रामसेवकाने अनियमतता केल्याचा आरोप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव दहिवद (ता. अमळनेर ) येथे दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या 5 टक्के निधी वाटपात तत्कालीन ग्रामसेवकाने अनियमतता केल्याने अनेक अपंग बांधव लाभापासून वंचित राहिले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबधित ग्रामविकास अधिकारी संजीव सैदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीसाठी प्रहार अपंग संस्थेचा नागरिकांनी जिल्हा परिषदाबाहेर थाळीनाद आंदोलन केले.

तीन तास सुरु होते आंदोलन

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 5 टक्के अपंग निधीच्या चौकशीची मागणी संस्थेने केली होती. याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक कारवाईस पात्र असल्याचा अहवाल दिला आहे. मात्र जि.प. ग्रामपंचायत विभागाकडून दोन महिने होऊनही अद्याप यावर कोणतीही कारवाई केली नाही, यामुळे संतप्त दिव्यांग बांधवांनी प्रहार अपंग संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषदेसमोर ताटे, चमचे वाजवून थाळीनाद आंदोलन केले. तीन तास हे आंदोलन सुरु होते.

उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. थाळीनादच्या कर्कश आवाज घोषणांनी परिसर निनादला होता. दहा ते पंधरा दिव्यांग बांधवांनी यात सहभाग घेतला. आंदोलनात तालुका अध्यक्ष योगेश पवार, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, संगीता पाटील, प्रवीण काटे, नुरखान पठाण, प्रदीप सोनवणे यांनी सहभाग घेतला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी संबधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करुन जिल्हापरिषदेस अहवाल सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकारींना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...