आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:नाेकर भरतीवरून आजी-माजी संचालक भिडले, जळगाव गव्हर्नमेंट सर्व्हंट साेसायटीच्या सभेत गाेंधळ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावात ग. स. साेसायटीच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नाेकर भरतीच्या मुद्द्यावरून प्रचंड गाेंधळ उडाला. सत्ताधारी व विराेधक एकत्र येण्यामागे हेच कारण असल्याचा आराेप करत ‘वीस खाेके, संचालक आेके’च्या घाेषणा देण्यात आल्या. सभासदांना बाेलण्याची संधी न दिल्याने वाद वाढत गेला. त्यामुळे थेट व्यासपीठावरच आजी-माजी संचालकांसह सभासदांत हाणामारी झाल्याने विषय मंजूर करत २० मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली. जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची सहकारी पतपेढीची (ग. स. साेसायटी) सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी १.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालय सभागृहात आयाेजित करण्यात आली हाेती.

सभेच्या सुरुवातीला १२ पैकी पाच विषयांना मंजुरी देण्यात आली. सभासदांनी डिव्हिडंड सहा टक्क्यांऐवजी १० टक्के देण्याची मागणी केली; परंतु सत्ताधाऱ्यांनी एकामागून एक िवषय मंजूर करण्याचा धडाका लावला. त्यामुळे सभासदांनी घाेषणाबाजी करत थेट व्यासपीठ गाठत जाब विचारला. गाेंधळ सुरू असताना चाेपडा व चाळीसगाव येथील सभासदांत धक्काबुक्की झाली. यादरम्यान संस्थेच्या अाजी-माजी संचालकांत थेट वाद उफाळून आल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. वेळीच पाेलिसांना पाचारण केल्याने वाद निवळला.

राष्ट्रगीताचा पुन्हा अवमान : ग.स. साेसायटीच्या सभेत पुन्हा राष्ट्रगीताचा अवमान झाला. सभासदांना बाेलू न देणे व त्यातून वादाला सुरुवात हाेणे हा पायंडा कायम राखण्यात आला. त्यातच सर्व विषय मंजूर करत राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली. तरीही गाेंधळ सुरूच राहिल्याने राष्ट्रगीताचा अवमान झाला. ग.स. साेसायटीच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांवर आराेप करणारे सहकार, लाेकसहकार व प्रगती गटाचे सर्व संचालक एकत्र आल्याने सभासदांत राेषाचे एक कारण ठरले. लवकरच संस्थेत नाेकर भरती हाेणार आहे. त्यात सत्ताधारी ३० व विराेधकांना प्रत्येकी १० जागा देण्यात येणार असल्याचा आराेप करण्यात आला.

सभा गंुंडाळण्याची सत्ताधाऱ्यांवर वेळ... सभेची अजेंड्यावरील वेळ ११ वाजेची हाेती; परंतु दाेन दिवस आधीच सभेची वेळ दुपारी १.३० वाजेची करण्यात आली. त्यामुळे हजाराे सभासद मीटिंग भत्ता घेऊन निघून गेले हाेते. सभागृहात सुमारे दीड हजार सभासद उपस्थित हाेते; परंतु प्रथमच सत्ताधारी व विराेधक एकत्र आलेले असताना सभासदांनीच विराेध केल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी लाेकसहकार गटाचे अध्यक्ष मनाेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनीच गाेंधळ घातल्याचा आराेप केला.

बातम्या आणखी आहेत...