आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय मजदूर संघातर्फे महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांवर कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २१ डिसंेंबर रोजी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मजदूर संघाची ६ नोव्हेंबरपासून मजदूर चेतना यात्रा सुरु झाली असून ती १७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सभा, बैठका मेळावे घेण्यात आले.
यात्रेतून ५ हजार कामगारांसोबत संपर्क करण्यात आला. घरेलू कामगारांचे प्रश्न, बांधकाम कामगार कल्याण मंडळ यासह विविध प्रश्नांवर हे आंदोलन केले जाणार आहे. राज्यातून १ लाख कामगार नेण्याचा निर्धार केला आहे, असे आवाहन विभाग संघटन मंत्री सुरेश सोनार, जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी, बी. बी. सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.