आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचे आदेश:चाेपड्याच्या अतिक्रमित जागेबाबत मोठा दिलासा ; जिल्हाधिकारी घेणार निर्णय

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाेपडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेशाविराेधात अशाेक पाटील यांच्यासह तिघांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली हाेती. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणी घेवून निर्णय घेण्याचे आदेश देत याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे. चोपडा येथील अशोक पाटील, भीमराव कोळी, धोंडू सपकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेशाविराेधात खंडपीठाकडे दाद मागितली होती. ॲड. भूषण महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना जमीन महसूल संहितेनुसार अवैध अतिक्रमण काढण्यापूर्वी सुनावणी घेऊन चौकशी केल्यानंतरच अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस देता येते असा युक्तीवाद केला. याचिकाकर्ते हे कित्येक वर्षांपासून कब्जेधारक असल्याने अतिक्रमण नियमानुकुल होण्यास पात्र आहेत असा युक्तिवाद केल्यावर न्यायालयाने आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...