आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगद्गुरू संतश्री तुकाराम महाराज यांचा ३७४वा बीज सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त काथार कंठहार वाणी समाजातर्फे प्रतिमापूजन, महाप्रसाद, शोभायात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी आठ वाजता नागो गणू मंगल कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांनी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. समाज अध्यक्ष विजय वाणी, उपाध्यक्ष सुनील वाणी, महोत्सव समिती अध्यक्ष रवींद्र वाणी सुधाकर वाणी, अरविंद वाणी, संध्या वाणी, अलका वाणी, सतीश वाणी, प्रमोद वाणी उपस्थित होते.
कलशधारी महिला, भजनात दंग झालेले भाविकांसह समाजबांधवांनी भजने, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. शोभायात्रेत संत तुकाराम महाराजांचा आर्कषक चित्ररथ हे वैशिष्ट्य ठरले. शहरातील नवीपेठ, टॉवर चौकमार्गे मंगल कार्यालयात शोभायात्रेचा समारोप झाला. मोनाली कामळस्कर फाउंडेशन, विठ्ठल मंदिर संस्थान शिरसोली, आसोदा, काथार वाणी समाजसेवा संघ, विठ्ठल मंदिर संस्थान पिंप्राळा, जनवाणी नागरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह वसंतराव बाविस्कर, अनिल वाणी, संतोष वाणी, मनीष वाणी, योगेश वाणी, नीलेश वाणी, मुकुंद वाणी, उदय वाणी, गणेश डाळवाले, भालचंद्र वाणी, नीलेश पंडित, नंदकिशोर कामळस्कर, अजय कामळस्कर यांनी यशस्वी असे नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.