आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:कामगार कल्याण मंडळातर्फे गट; राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालयातर्फे गटस्तरीय व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा २ ते ८ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात येत आहेत. स्पर्धा १८ वर्षांवरील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित या स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपले निबंध जवळच्या कामगार कल्याण केंद्रात जाऊन देणे आवश्यक आहे. निबंधासाठी ‘बलसागर भारत होवो’आजच्या युवकांच्या मनातील भारत व ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि पुढील आव्हाने’ या विषयावर निबंध लिहायचा आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या पहिल्या तीन व उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. गटस्तरीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. गटस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आयुक्त रविराज इळवे, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खडेकर यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...