आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात भाईगिरीचे वाढते वलय:शहरात चॉपर, तलवार भिरकवणाऱ्या दोन टोळक्यांवर गुन्हा दाखल; घटना सीसीटीव्ही कैद

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एकमेकांवर हल्ला करण्यासाठी दोन गट चॉपर, तलवार अशा हत्यारांसह सज्ज झाले होते. पोलिसांचे वाहन येताच दोन्ही गट पळून गेले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी पदमालय रेस्ट हाऊसजवळ ही घटना घडली.

घटना अशी की, जुन्या वादातून दोन गट पदमालय रेस्ट हाऊसजवळ एकमेकांच्या समोर आले. यातील काही तरुणांच्या हातात हत्यारे देखील होती. वाद सुरू होताच परिसरात तणाव निर्माण झाला. नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवली. काही मिनीटातच शहर पोलिस ठाण्याचे पथक तेथे आले. पोलिसांना पाहून दोन्ही गटातील तरुण पळून गेले होते. यानंतर पोलिसांनी परिसरातील काही दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात दिसून आलेल्या चित्रीकरणावरुन गणेश रवींद्र सोनवणे, अक्षय पाटील, गणेश सोनवणे उर्फ जग्गू, साबू (पुर्ण नाव माहित नाही), अण्णा राठोड, दीपक सुकलाल सोनवणे, सुनील रसाल, राठोड (सर्व रा. कांचननगर), गौरव गायकवाड (रा. समतानगर) यांच्यासह आठ ते दहा जणांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दंगल, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय निकुंभ तपास करीत आहेत.