आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:पालकमंत्री-महापाैर वाद; भाेळे मध्यस्थी करणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाला शहरातील समस्यांबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही. अधिकाऱ्यांकडून काेणतीही सकारात्मकता दिसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सत्ताधारी व विराेधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दाेन्ही नेत्यांच्या माध्यमातून प्रश्न साेडवणे आवश्यक आहे. महापाैर व पालकमंत्र्यांमधील वाद साेडवण्यासाठी स्वत: पुढाकार घेण्याची तयारी असल्याचे आमदार सुरेश भाेळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील नागरिकांसमाेर सगळ्यात माेठी समस्या खराब रस्त्यांची आहे. प्रशासनाकडून खड्डे देखील बुजवले जात नाहीत. नवीन रस्त्यांच्या कामासाठी प्रस्ताव देखील तयार केले जात नाहीत. त्यात महापाैर जयश्री महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील मतभेद विकासाला मारक ठरण्याची भीती आहे.

निवडणुकांना अजून वेळ आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सगळे मिळून शासनाकडून निधी मंजूर करायला हवा यासाठी आम्ही तयार असल्याचेही आमदार भाेळे यांनी सांगितले. महापाैर महाजन यांनी निधी मिळत नसल्याचा आराेप केला असला तरी आमदार भाेळे यांनी पालकमंत्र्यांचे समर्थन केले आहे. गेल्या वर्षी पालकमंत्र्यांनी भरघाेस निधी दिला हाेता. त्यामुळे त्यांचे स्वागत केल्याची आठवण करून देत पालिकेकडून मिळालेल्या निधीचा वेळेत विनियाेग हाेत नसल्याचा आराेप केला.

शहरातील रस्त्यांची जबाबदारी महापालिकेची असताना वारंवार शासनाकडे मदतीची अपेक्षा करणे गैर असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शहरासाठी ४० ते ५० काेटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले असून निधी लवकरच मिळेल, असा विश्वास आमदार भाेळेंनी व्यक्त केला. महापौरांनी श्वेतपत्रिका प्रसिध्द करताना त्यात कर्जमाफी कोणामुळे मिळाली हे देखील जाहीर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता भगत बालाणी, उपगटनेता राजेंद्र पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, मनाेज भांडारकर उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...