आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतरावे:पालकमंत्री म्हणाले, सुरेश जैन यांनी मैदानात उतरावे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरेश जैन यांचे बोट धरून मी राजकारणात आलो आहे. ते बऱ्याच दिवसांनी जळगावात आले. वडिलकीच्या नात्याने त्यांचे आशीर्वाद घेतले. पालकमंत्री म्हणून स्वागत केल्याची प्रतिक्रया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

माजी आमदार जैन बुधवारी जळगावात आले. पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी सकाळी शिवाजी नगरातील जैन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, माजी आमदार सुरेश जैन हे मुंबईत असले तरी त्यांचे सर्व लक्ष जळगावकडे होतेे. आता त्यांच्या सूचनेनुसार काम करु. राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे पण, त्यांनी मैदानात आले पाहिजे. त्यांनी आतापर्यंत जनतेला वेळ दिला. उर्वरित वेळ कुटुंबीयांना देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे. काही चुका होत असतील तर दुरुस्तीसाठी मार्गदर्शन करावे.

बातम्या आणखी आहेत...