आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन सत्र:उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे स्वयंरोजगारावर मार्गदर्शन सत्र

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव कार्यालयामार्फत युवक-युवतींसाठी ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन गुरुवारी दुपारी ३ वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन केंद्राच्या यंग प्रोफेशनल सीमा शर्मा यांनी ‘स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राेजगार उभारताना नेमके काय केले पाहिजे, भांडवल कसे उभारावे याबाबत सल्ला देण्यात आला. कोणताही व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्ये, विपणन व्यवस्था, मनुष्यबळ याबाबत मान्यवरांनी विचार मांडले. सहभागी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली, तसेच शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...