आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रोटरी इलाईटतर्फे विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच वर मार्गदर्शन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फे वाघनगरातील विवेकानंद प्रतिष्ठान सेमी इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांना “गुड टच-बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. वैशाली सरोदे यांनी मुलींना या विषयाची माहिती देत घ्यावयाची काळजी, अशा घटना घडल्यानंतर काय करावे, याबद्दल मार्गदर्शन करून काही व्हिडिओ दाखवले.

अध्यक्ष डॉ. पंकज शाह यांनी या विषयाचे महत्त्व व विद्यार्थी-पालकांचा प्रतिसाद, यासह विद्यार्थिनींनी खंबीर राहून यास प्रतिकार करण्याची क्षमता वाढवणे याविषयी मार्गदर्शन केले. यासह हा उपक्रम अन्य पाच शाळांमध्ये राबवण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील, डॉ. वैशाली सरोदे, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. दर्शना शाह उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...