आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबभाऊ, तुमच्यावर फडणवीसांनी ​​​​​​​कोणती भानामती केली:तुम्ही एवढे निगरगठ्ठ झालात? सुषमा अंधारेंचे गुलाबरावांना प्रत्युत्तर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी जर तीन महिन्यांचे बाळ असेल तर बाळाला काहीही करण्याचा अधिकार आहे. बाळ गालगुच्चे ओढते, मोठ्या भावाच्या गालावर चापटा मारते, लाथा मारते.गुलाबराव पाटील मला बाळ म्हणत असतील तर बाळ म्हणून हे सर्वकाही करण्याचा अधिकार ते देत आहेत. त्यांच्या विधानाला सकारात्मकतेने घेत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले. उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेले कपट कारस्थान मला पहावले नाही.

पाटील शिवसेनेच्या जीवावर गलेलठ्ठ झाले

काळजाला वेदना झाल्या. भाऊ संकटात असल्याने धावून आले. टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटतो. तुमच्यासारखी तीस-तीस वर्षे सत्तेचा मलिदा खावून शिवसेनेच्या जीवावर गलेलठ्ठ व मस्तवाल झाले.तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही? देवेंद्र फडणवीसांनी कोणती करणी, भानामती तुमच्यावर केली. एवढे निगरगठ्ठ, पाषाणह्रदयी झाला. बहीण म्हणून तुमच्या विवेकाला हात घालते.बघा जागा झाला तर,अशा शब्दात त्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

बंडखोरांनाच सुरक्षेची गरज

प्रा.अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अंधारे या शिवसेनेत तीन महिन्यांपूर्वी आलेले बाळ आहे.तीन महिन्यांपूर्वी त्या उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करीत होत्या,अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर केली होती.त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तरे देत होत्या. सत्ता असूनही त्यांना सुरक्षा घेऊन फिरावे लागतेय. यातच उत्तर आले. बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे.

ये डर मुझे अच्छा लगा

लाेक त्यांना सांभाळून घेणार आहेत. सत्ताधाऱ्यांना सुरक्षेची गरज आहे. कारण त्यांनी मिळवलेली सत्ता अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने व कपट कारस्थाने करुन मिळवलेली आहे. ही कपट कारस्थाने जनतेला अजीबात आवडलेली नाहीत. जनता प्रचंड संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी घाबरलेल्या सरकारने सुरक्षा वाढवून घेतलेली आहे. कारण त्यांना लोकांचे पाठबळ नाही. धरणगाव येथे लावण्यात आलेल्या अंधारे यांच्या स्वागताचे फलक अज्ञात व्यक्तीने काढून नेले. त्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. ये डर मुझे अच्छा लगा अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

चिल्हर चाळे करु नयेत

या सर्व गोष्टी एन्जॉय करते. बॅनर पळवल्याने काय होईल? तुम्ही शिवसैनिक पळवणार आहात का? शिवसैनिकाचा विचार, आमच्यासोबत असणारी कनेक्टीव्हीटी, आपुलकी, आपलेपणा पळवणार आहात काय? गुलाबराव पाटील यांनी छोट्या छोट्या गोष्टींचे चिल्हर चाळे करु नयेत. नाही तर लोकच त्यांना कसं काय पाटील बरे हाय का? काल काय ऐकलं ते खरे हाय का, काल म्हणे तुम्ही गुवाहटीला गेला. आम्हाला माहिती नाही. खोक्या बिक्याचा काहीतरी कारभार केला. अशी त्यांनी स्वत:वर वेळ येवू देवू नये,असे अंधारे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...