आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्या नादी लागू नका. मी साधा माणूस नाही. संजय राऊत सारख्यांना मी घाम फोडतो. तर, बाकीचे कुठे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या जळगावधील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
स्थानिक पदाधिकाऱ्यांना टोला
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते. मी बारक्यांच्या नादी लागत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना लगावला.
बारक्यांच्या नादी लागत नाही
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला भरसभेत प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनीही खोचक प्रत्युत्तर दिले. गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो. विधानसभेच्या सभागृहात नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही पाटील म्हणाले.
शरद पवारांना प्रत्युत्तर
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावरुन शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, लोकांना आता बदल हवा आहे, असेही शरद पवार म्हणाले. याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. गुलाबराव पाटील म्हणाले, नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार निवडून आल्यामुळे शरद पवार नक्कीच आनंदी असतील. मात्र, त्यामुळे राज्यातही सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक राज्याचे गणित वेगवेगळे असते. राज्यांमधील समस्या वेगवेगळ्या असतात. त्या परिस्थितीनुसार लोक मतदान करत असतात. लोकसभेचा निकाल वेगळ्या पद्धतीने लागतो, तर विधानसभेचा निकाल वेगळ्या पद्धतीने लागतो. त्यामुळे एका निवडणुकीवरुन पुढील निवडणुकीचा अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा,
पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू:संजय राऊतांची घणाघाती टीका; पंजाबमधील खलिस्तानी खदखद, अंशात कश्मीरवरुन टीका
पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.