आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राणेच पांढऱ्या पायाचे; मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट : गुलाबराव पाटील

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.

राज्यावर संकट असताना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. पक्षाचा विचार न करता संकटात सापडलेल्यांना मदत करणे हीच भावना असली पाहिजे. राजकारण करायला भरपूर आखाडे आहेत. त्या आखाड्या तुम्ही तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन उतरू. त्या वेळी जनता ज्याला आशीर्वाद देईल, तो आपण मान्य करायचा असताे. मात्र, अशा संकटाच्या वेळी कुणीही राजकारण करताना विचार करायला हवा’ असा सल्ला मंत्री पाटील यांनी विरोधकांना दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील यांनी अपंगासाठी १० लाखांच्या साहित्याचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...