आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:घरकुलाच्या जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपये, गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

xभूमिहीन लाभार्थींना घरकुले बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी सद्य:स्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळते. एवढ्या कमी पैशांमध्ये जागा मिळणे शक्य नसल्याचे सर्व आमदारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले आहे. ही रक्कम १ लाख रुपये करणार असून १५ दिवसांत त्याबाबत शासन निर्णय घेणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. अमृत महा आवास ३१ अभियानांतर्गत जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मंत्री पाटील बोलत होते.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. ३१ मार्चपर्यंत घरकुलांचे बांधकाम पूर्ण करायचे आहे. पण त्याचा अर्थ ते घाईगर्दीत आणि दर्जाशी तडजोड करत होऊ द्यायचे, असा होत नसल्याचा इशाराही पाटील यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...