आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खातेवाटपावर गुलाबराव पाटलांचा शायराना अंदाज:पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलादे लगे उस जैसा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलादे लगे उस जैसा, असे म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावर गुलाबराव पाटील यांनी शायराना अंदाजात उत्तर दिले. खातेवाटपात जे खाते मिळाले आहे त्यावर समाधानी आहात का? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.

खाते कुणाला कोणते दिल यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्याची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची जबाबदारी ही मंत्र्याची असते. खाते तर वाटप करताना थोडं इकडे तिकडे झाले असेल. मात्र उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू की तिकडे ठेवू, असं म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप तुपाशी तर शिंदे गट उपाशी अशी टीका सामनामधून केली होती.

खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर चष्मा तर मी पण घातला आहे, असे मिश्किल उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्री गुलाबराव पाटील जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करत असतानाच जामनेरच्या एका महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

शिंदे गट नाराज

शिंदे- फडणवीस सरकारचा बऱ्याच दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप देखील झाले आहे. विस्तारावर होऊ शकणारी नाराजी खातेवाटपात समोर येत आहे. थेट कॅबिनेट मंत्र्यांचीच नाराजी समोर येऊ लागल्याने मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...