आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजन म्हणाले राऊतांचा मेंदू तपासण्याची गरज:संजय राऊत यांच्या डोक्यात कोणता मेंदू हे त्यांनी सांगावे; गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत मेंदूचे डॉक्टर थोडेचआहेत.त्यांच्या डोक्यात कोणता मेंदू आहे,हे सांगितले तर बरे होईल.बोलणे आणि प्रसिध्दी मिळवणे हे त्यांचे कामच आहे.त्यांच्या म्हणण्याला महत्व द्यावे,अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

गिरीश महाजन म्हणाले?

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊतांबद्दल काय बोलावे, केंद्र सरकार दिल्लीत आहे. पंतप्रधान, मंत्री तेथे असतात. त्यांना वाटत असेल आमचा मेंदू तेथे गहाण आहे, तर हे हास्यास्पद वक्तव्य आहे. त्यांचाच मेंदू तपासण्याची वेळ आली आहे. त्यांची तिच परिस्थिती झालेली आहे. तोल सुटल्यासारखे बेताल विधाने ते करीत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले?

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन उत्तरे देत होते. ठाणे बंदवरुन राऊत यांनी त्यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू असल्याची टीका केली होती. त्यावर दोन्ही मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मविआच्या मोर्च्याचाही समाचार घेतला. मोर्चे काढणे हे विरोधकांचे कामच आहे. मोर्चा काढलाच पाहिजेत. मोर्चे काढल्याशिवाय विरोधी पक्ष जीवंत राहत नाही. आपली बाजू सांगण्यासाठी मोर्चा हे सर्वात मोठे अस्त्र आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही सुध्दा दरवर्षी मोर्चे काढायचो.

पक्ष जिंवत ठेवण्यासाठी करावे लागते

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पक्ष जागा असल्याची ती एक प्रवृत्ती असते. त्यांच्या माेर्चात चांगल्या मागण्या असतील तर निश्चितपणे सरकार त्यांचा विचार करेल. मागण्या करण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते. चर्चेची मागणी करावी लागते. त्यांनी न ऐकल्यास मोर्चा काढण्याबाबत सांगावे लागते. त्यांनी सोयरीक केलीच नाही. कसे म्हणणार प्रश्न सुटले नाहीत, असे पाटील म्हणाले. त्यांच्या देशात जावून जर त्यांना उडवले असले तर त्यांची चांगली प्रवृत्ती राहणार नाही. पाकिस्तानला कापून टाकणारे कसाई आहोत आपण, अशी प्रतिक्रियाही त्यांनी पाकिस्तानी विदेश मंत्र्यांच्या वक्तव्यावर दिली.

बातम्या आणखी आहेत...