आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्युत्तर:शिवसेनेमुळेच नारायण राणे माेठे झाले आणि रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणे देशातही राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात : मंत्री भुसे

राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे, अशा परिस्थितीत योग्य नाही. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या नारायण राणे यांना हे वागणे शोभत नाही. ज्या शिवसेनेमुळे ते मोठे झाले, त्याच सेनेमुळेच ते रस्त्यावर आले, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे यांना लगावला आहे.

कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती महाराष्ट्राने आणलेली नाही. जगासह देशात तिचा प्रादुर्भाव झाला आहे. ही एक आपत्ती आहे, राजकारणाची ती व्यवस्था नाही. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांत कुठे त्रुटी राहत असतील तर त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे. पण असे न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली होती. कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी’, अशी मागणी राणे यांनी केली होती. राणेंच्या या भूमिकेचा गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत जळगावात होणाऱ्या विभागीय आढावा बैठकीपूर्वी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीतही लागू करावी. देशातील इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे. कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? या दृष्टीने सूचना त्यांनी द्याव्या. राणेंचे शिवसेनेशी जुने नाते आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे प्रेमाचे नाते असल्याचेही पाटील म्हणाले.

राणे देशातही राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात : मंत्री भुसे

राजभवनावर जाण्याचा, मत मांडण्याचा कुणालाही अधिकार आहे. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की काहीही मागणी करावी. आज आम्ही कोरोनाशी लढण्यात व्यग्र आहोत. शेतकऱ्यांना मदत करत आहोत. आजची ही वेळ राजकारणाची नाही. लोकशाही पद्धतीने म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. नारायण राणे हे महान नेते आहेत. ते काहीही मागणी करू शकतात. राज्यातच नव्हे तर देशातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात. भाजपच्या पत्रकार परिषदेला शुभेच्छा, अशा बाेचऱ्या शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी राणेंवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...