आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा चेहरा आपल्यापासून लांब जात आहे, तो जाता कामा नये, हे उद्धव ठाकरेंना आधी समजावले होते. नागपूर ते दादर सर्वच जण आपल्यापासून लांब जात आहे, मग उद्धव ठाकरेंसोबत राहून मतदारसंघाचा विकास होणार नाही, यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघाचा विकास करू शकलो नसतो. म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगाव मधील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागपूरपासून दादरपर्यंत सर्व गेले असा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून शिंदेसोबत गेलेले नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागत आहे. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊन व स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र आता मूळ कामे सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे सात महिन्यात पाच वेळा जळगावमध्ये आलेले पहिले मुख्यमंत्री आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. जनतेला काम हवय बोलबच्चन अमिताभ बच्चन नको, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर केवळ खोके-खोके बोलून विकास होत नाही, तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे, खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे. ते काम मी करत असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.