आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा माेठा बदल:रात्रीचे तापमान एक अंशाने घसरल्याने गारठा ; 10 अंशापर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात उकाडा वाढल्यानंतर वातावणात पुन्हा माेठा बदल व्हायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी किमान तापमानाची नाेंद १२ अंश सेल्सिअस करण्यात आली. तापमान पुन्हा एक अंशाने घसरले. वातावरणातील गारठा वाढला आहे. साेमवारच्या तुलनेत मंगळवारी थंडीत वाढ झाल्याचे जाणवत हाेते. येत्या चार दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. रविवारपर्यंत रात्रीचे तापमान १० अंशापर्यंत येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. वातावरणातील बदलाचे आराेग्यावर परिणाम जाणवू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...