आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी पुन्हा कमी:ताशी 25 किमी वेगाच्या वाऱ्यांमुळे गारठा ; जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल ६० टक्के आकाश ढगांनी व्यापले असताना जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर थंड वारे ताशी २५ किमीने वाहत आहे. तर पहाटेपासून वाऱ्याचा वेग ताशी आठ किमीवरून वाढून १२ किमी झाल्याने गारठा वाढला आहे. दाेन दिवस जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता पुन्हा कमी हाेईल. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळामध्ये रूपांतर झाले असून, हे वादळ गुरुवारी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकेल. त्याचा प्रभाव म्हणून राज्यात वाऱ्याचा वेग वाढला असून, वातावरण ढगाळ आहे. दाेन दिवसांत किमान तापमानात १९.८ अंशांपर्यंत वाढ झाल्याने थंडी कमी झाली हाेती. बुधवारी १८.५ अंश सेल्सिअसची नाेंद झाली.

राज्यात पावसाची शक्यता पूर्वकिनारपट्टीवर धडकणाऱ्या वादळामुळे राज्यात वातावरण ढगाळ आहे. ही स्थिती दाेन-तीन दिवस असेल. या काळात उत्तर महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस हाेण्याची शक्यता आहे. बुधवारी जिल्ह्यात वाऱ्याचा सामान्य वेग ताशी १२ किमीपर्यंत हाेता. तेदेखील पुढील दाेन दिवस स्थिर राहील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...