आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात पुन्हा वाढ:गारठा आजपासून रात्री वाढू शकताे‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून सहा अंश ‎सेल्सिअसने घट झालेल्या कमाल ‎ ‎तापमानात पुन्हा वाढ झाली.‎ तापमान पुन्हा २९ अंश‎ सेल्सिअसवर गेल्याने शनिवारी‎ दिवसा उन्हाचा चटका जाणवत‎ हाेता. रात्रीचे तापमान १४ अंशांपर्यंत‎ वाढल्याने रात्रीची थंडीही कमी‎ झालेली हाेती.

दरम्यान,‎ रविवारपासून किमान तापमान १०‎ अंशांच्या खाली येण्याची शक्यता‎ असल्याने रात्रीचा गारठा पुन्हा वाढू‎ शकताे. मकरसंक्रांतीपर्यंत रात्रीचे‎ तापमान १० अंशाच्या जवळपास‎‎ स्थिर राहील तर त्यानंतर कमाल‎ तापमानात मात्र ३२ ते ३३ अंश‎ सेल्सिअसपर्यंत असेल. त्यामुळे‎ रात्री गारठा व दिवसा उन्ह राहील.‎

संक्रांतीनंतर वाढणार उन्हाचा चटका ‎
येत्या १५ जानेवारीपासून दिवसाचे कमाल तापमान ३२ ते ३३ अंश‎ सेल्सिअसपुढे जाऊ शकते. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि उकाडा‎ जाणवेल. ८ ते १४ जानेवारी दरम्यान रात्रीच्या वेळेचे किमान तापमान १०‎ अंशांपर्यंत खाली आलेले असेल. रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीची तीव्रता‎ अधिक असेल. १५ जानेवारीनंतर किमान तापमान १६ अंशांपर्यंत वाढू शकते.‎

बातम्या आणखी आहेत...