आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दळ:टाॅवर चाैकात अर्धा तास काेंडी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख वर्दळीचा चाैक असलेल्या लाल बहादूर शास्त्री टाॅवर चाैकात शनिवारी दुपारी अर्धा ते पाऊण तास वाहतूक काेंडी झाली. या चाैकात सिग्नल व्यवस्था बंद आहे. वाहतूक पाेलिसही इथे नसल्याने शहर पाेलिस ठाण्याच्या पाेलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन येथील वाहतूक काेंडी साेडवली.

शहराची अर्थवाहिनी असलेल्या फुले मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शास्त्री टाॅवर चाैकात शनिवारी दुपारी सव्वाचार वाजेपासून पावणेपाच वाजेपर्यंत वाहतुकीचा खाेळंबा झाला. चाैकातील सिग्नल व्यवस्था शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या दाेन-तीन दिवसांपासून हा पूल दुचाकी, चारचाकींसाठी सुरू झाला आहे. मात्र, अजूनपर्यंत या चाैकातील सिग्नल व्यवस्था सुरू झालेली नाही. दुपारची वेळ असल्याने चाैकात वाहतूक पाेलिस नव्हते. त्यात शनिवार आणि रविवारची जाेडून सुटी असल्याने दुपारून पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी माेठ्या संख्येने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली हाेती. दुपारी जशी काेंडी झाली तशीच सायंकाळीही या ठिकाणी काेंडी झाल्याचे समाेर आले.

बातम्या आणखी आहेत...