आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे दुर्लक्ष:जळगाव शहरातील लोंबकळणाऱ्या तारा पावसाळ्यात जीवघेण्या; तारांना आवरण लावावे, नागरिकांची मागणी

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात उघड्या डीपी, तिरके पोल व लोंबकळणाऱ्या तारांची समस्या गंभीर बनून जीवितहानीची भीती नागरिकांना सतावत आहे. सध्या महावितरणने वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यावी मोहीम सुरू केली आहे. मात्र, याच बरोबर शहरात अनेक डीपी उघडे, पोल तिरके तर अनेक वीजवाहक वाहिन्या ह्या लोंबकळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात जीवितास हानी पोहोचवणाऱ्या अशा उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या वीज तारा व तिरके पोल सरळ करण्याकडे महावितरणने जोर दिला पाहिजे.

शहरात पाचशेहून अधिक डीपी उघड्या आहेत. तर तितकेच पोलदेखील तिरके झाले आहेत. अनेक भागात वीजवाहिन्या देखील लोंबकळत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे आगामी पावसाळा वादळ-वारा यामुळे या उघड्या डीपी, तिरके झालेले पोल व लोंबळणाऱ्या वायरी जीवघेण्या ठरू शकतील.

दोघांचा झाला होता मृत्यू

दोन वर्षांपूवी मेहरूणमधूल शेरा चौकात पावसाळ्याच्या दिवसांत 11 केव्हीच्या हायहोल्टेज विद्युत तारा कोसळून दोघांचा मृत झाला होता. त्यामुळे रहिवासी भागातील हायहोल्टेज विद्युततारांना संरक्षण आवरण बसवण्याची गरज आहे. तसेच या तारांना संरक्षण आवरण बसवण्याबाबतही या परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

उघड्या डीपी, तिरके पोल

उघड्या डीपी तर गल्लोगल्ली दिसून येतात. शहरात 500हून अधिक उघड्या डीपींची संख्या आहे. यात शाहूनगर परिसर, गोविंदा रिक्षा स्टॉप परिसर, शिवतीर्थ रोड, स्टेट बँक मुख्य शाखा, पांडे डेअरी चौक, तुकारामवाडी परिसर, तरुण कुढापा चौक, फुले मार्केट, पिंप्राळा रोड, हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, रामानंदनगर, आर. आर. शाळा परिसर, एमआयडीसी, अयध्योनगर, लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल, हुडको, शिवाजीनगर, जिल्हा रुग्णालय परिसर, मेहरूण, नेरी नाका, कालिंका माता मंदिर आदी परिसरात उघड्या डीपी दिसून आल्या. तिरके पोल शिवतीर्थ मैदान, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, चित्रा चौक परिसर. लोंबकळणाऱ्या तारा कोर्ट चौक, शनिपेठ परिसर, समतानगर, कांचननगर, गेंदालाल मिल आदी परिसरात लोंबकळणाऱ्या तारा दिसून येतात.

बातम्या आणखी आहेत...