आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. सागर सुरेश मराठे (रा. धरणगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

धरणगाव शहरात एका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी ही ११ मे २०१६ रोजी रात्री अंगणात झोपलेली असताना सागरने दारुच्या नशेत तिचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस येताच नागरिकांनी सागरला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या विरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल होता. हा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...