आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हतनूरला आढळले दुर्मिळ पाणमांजर

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनातर्फे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक तथा भारतीय पक्षी विश्व जागतिक स्तरावर पोहोचवणारे मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली या दोघांचा जन्मदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच हा महिना पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानुसार यंदाही हतनूर जलाशयावर पक्षी निरीक्षण करण्यात येत असून पहिल्याच दिवशी दुर्मिळ चार पाणमांजरे आणि ८० पेक्षा जास्त प्रजातीच्या पक्ष्यांची नाेंद केली आहे.

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हा या सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश आहे. जगभरातील पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असून, अनेक पक्षी प्रजाती दुर्मिळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. राज्यातील पक्ष्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संरक्षणाप्रती जबाबदारी स्पष्ट व्हावी यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे.

सन २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा पक्षी सप्ताहाचे आयोजन केले होते. यंदाही हतनूर धरणावर या अंतर्गत पक्षी निरीक्षणास सुरुवात झाली. शनिवारी सामाजिक वनीकरण विभागाचे उपवन संरक्षक भारत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, समीर नेवे, सौरभ महाजन यासह सदस्यांनी सहभाग घेतला. सप्ताहात १२ तारखेपर्यंत हतनूर जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण केले जाणार आहे.

अस्तित्वास धाेका
गुळगुळीत-लेपित ऑटर (लुट्रोगेल पर्स्पिसिलाटा) ही एक ओटर प्रजाती आहे, जी बहुतेक भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. हे १९९६ पासून आययूसीएनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे आणि अधिवास नष्ट होणे, पाणथळ प्रदेशांचे प्रदूषण आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापारासाठी शिकार यामुळे त्याच्या अस्तित्वास धोका आहे. त्याच्या नावाप्रमाणे त्याची फर इतर ओटर प्रजातींपेक्षा गुळगुळीत आणि लहान आहे.

बातम्या आणखी आहेत...