आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठा:हतनूर, गिरणा, वाघूर धरणात यंदा 5 टक्के पाणीसाठा जास्त ; पाणीटंचाईची फारशी चिंता नाही

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख जलस्रोत असलेल्या मोठ्या प्रकल्पांत ४२.८६ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.२१ टक्के अधिक आहे. मध्यम प्रकल्पात एकूण २९.१४ टक्के जलसाठा आहे. यात जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. (४.८४ टक्के अधिक) तर लघुप्रकल्पांत १४.८७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची फारशी चिंता नाही. जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा व वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. तर अभोडा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी व मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहेत. तर लघुप्रकल्पांची संख्या ९६ आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...