आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट:उष्णतेची लाट तीव्र; आज तापमान पुन्हा 43 अंशापुढे जाणार

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र असून गुरूवारी तापमान पुन्हा ४३ अंशापुढे जाण्याची शक्यता आहे. जळगावात ४ मे रोजी कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस तर किमान २६.२ एवढे उच्चांकी नोंदविण्यात आले आहे. खान्देशासह विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असून उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे. ४ मे रोजी जिल्ह्यात उष्ण वाऱ्याचा वेग ताशी १५ किमी असल्याने ४२.२ अंशावर गेलेले तापमान प्रत्यक्षात ४५ अंशाची अनुभूती देणारे होते.

येत्या दोन दिवसांमध्ये तापमान पुन्हा एकदा ४३ अंशापुढे जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उष्ण वाऱ्यामुळे सूर्यास्तानंतर शहरात रात्री १० वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहे. पावसाचीही शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...