आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पाऊस:सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जाेरदार हजेरी; आजही दाट शक्यता

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जाेरदार हजेरी लावली. रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचाेरा आणि चाळीसगाव तालुक्यात वादळी पाऊस झाला. जळगाव शहरात मात्र रिमझिम पावसाने हजेरी दिली. शनिवारी रात्री काही ठिकाणी वादळी पाऊस झाला.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हाेऊन पावसाला प्रारंभ झाला. आठवडाभरात रावेरमध्ये सर्वाधिक २१ मिमी पाऊस झाला. जामनेर, चाळीसगाव, पाचाेरा आणि भडगावमध्येही जाेरदार पावसाने हजेरी लावली. रविवारीदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...