आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:चोपडा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, वैमानिक ठार तर प्रशिक्षणार्थी युवती गंभीर जखमी

जळगाव (प्रवीण पाटील)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम टेकडी परिसरात अचानक कोसळले.

तालुक्यातील विष्णापूर शिवारात गावापासून जवळपास सात ते आठ किमी अंतरावर सातपुडा डोंगररांगा मध्ये राम तलावाच्या पुढे दसभल्ली या वनविभागाच्या १९९ बिट कंपार्टमेंट मध्ये दि १६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दुर्घटना घडली असून यात विमान पायलट याचा जागीच मृत्यू झाला असून वैमानिकाचे प्रशिक्षण घेणारी महाविद्यालयीन युवतीचे दोघे पायांनी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील उत्तर भागातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वर्डी व विष्णापूर गावाच्या उत्तरेस आज दि १६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिरपूर येथील डोकोटा कंपनीचे प्रशिक्षणार्थी चार आसनाचे विमानात कॅप्टन नूर उल अमीन (२८),रा बंगलोर,हे आपल्या शिकाऊ विमानात अंशीका लखन गुर्जर(२४) रा. खरगोन) हिला वैमानिकचे प्रशिक्षण देत असतांना सदर विमान दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विष्णापूर

शिवारात गावापासून जवळपास सात ते आठ किमी अंतरावर पर्वत रांगांच्या पायथ्याशी कोसळले.या दुर्घटनेत विमानाचे पायलट नूर उल अमीन हे जागीच मृत झाले तर शिकाऊ वैमानिक विमानात अंशीका लखन गुर्जर ही गंभीर जखमी झाली होती तिला आदिवासी बांधव व वर्डी गावातील तरुणांनी विमानाच्या काचा फोडून तिला बाहेर काढले होते.

चोपडा तालुक्‍यातील विष्णापूर
शिवार असलेला भाग हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास झाली.दुर्घटनेचे ठिकाण डोंगराळ भागात असल्याने तेथे कुणीही पोहचू शकत नव्हते.त्या ठिकाणी जायला मोठ्या अडचणी येत असताना जवळपास सर्वच लोकांना व अधिकाऱयांना जवळपास गाड्या लावून पाच की मी अंतर पायी जावे लागत होते.

आदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधव व वर्डी गावातील काही युवक यांनी अक्षरशः साडीची झोळी करून अंशीका लखन गुर्जर या जखमी युवतीला रुग्णवाहिकेपर्यंत आणले जखमी महिला पायलटला बाहेर काढून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले तेथे डॉ राहुल विश्वनाथ पाटील यांनी उपचार केले. घटना घडल्यानंतर डॉ मनोज पाटील यांनी तात्काळ सोनू आठवण ,सागर बडगुजर ,भागवत चौधरी यांना रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल होण्याचे संगितले.

बातम्या आणखी आहेत...