आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने शौर्यनृत्य; सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे दांडपट्टा प्रात्यक्षिक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यात सुरुवातीला गोंधळ गीत, शौर्यनृत्य, दांडपट्टा व कवायतींचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यातर्फे सोमवारी शिवतीर्थ मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, करीम सालार, मुकुंद सपकाळे यांनी मार्गदर्शन केले.

अनिता चौधरी यांच्या शिष्यांनी शौर्यगीत, शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी यांनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, प्रतिभा शिरसाठ, अनंत जोशी, पुरुषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, विनोद देशमुख उपस्थित होते. शंभू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...