आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडू, पंचांचा गाैरव:क्रीडादिनी स्पर्धांसह मेजर ध्यानचंद यांच्या कार्याला उजाळा ; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

मानव सेवा विद्यालय : मानव सेवा विद्यालयात क्रीडा दिनानिमित्ताने गिरीश जाधव, मनोज बावस्कर यांनी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात कबड्डी, खो-खो या स्पर्धा घेण्यात आल्र्या. मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर, मुक्ता पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

जय दुर्गा विद्यालय : जय दुर्गा विद्यालय व कै. कौतुक महाजन विद्यालयात मेजर ध्यानचंद व क्रांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सागर कोल्हे, ज्योती पाटील यांनी प्रतिमापूजन केले. पी. एम. चिमणकर, नीलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यापिका विद्यालय : अध्यापिका विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने प्राचार्या एस. एम. चौधरी यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी एन. व्ही. बेंडाळे, एल. एस. महाजन, एन. बी. चव्हाण, सी. डी. लोहार आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी विद्यालय : महात्मा गांधी विद्यालयात क्रीडा दिनानिमित्ताने मुख्याध्यापक डी. के. धनगर यांनी प्रतिमापूजन केले. एस. पी. ठाकूर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. पी. बी. गायकवाड, सविता पाटील उपस्थित होते.

खेळाडू, पंचांचा गाैरव : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व हॉकी जळगावतर्फे मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रातील १९ खेळाडू, पंच व टेक्निकल ऑफिशियल यांचा गौरव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात करण्यात आला. आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, अशोक चौधरी, क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, फारुक शेख यांच्या हस्ते भाग्यश्री पाटील, प्रवीण ठाकरे, आयशा खान, सय्यद मोहसीन, योगेश धोंगडे, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, वाल्मीक पाटील, सोनल हटकर, मीनल हटकर, कृष्णा हटकर, कमलेश नगरकर, अमय नगरकर, कांचन चौधरी, अब्दुल मोहसीन, अब्दुल कादर, सय्यद लियाकत अली, दिनेश ओडिया, अल्तमस शेख जुबेर, सूरज सपके यांना विविध गटात सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...