आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह जिहाद, धर्मातर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, जैन बांधवांच्या पवित्र धार्मिक स्थळ श्री सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र घोषित करा या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी शिवतीर्थ मैदानावरून हिंदू जनसंघर्ष मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध सामाजिक, धार्मिक संघटना सहभागी झाल्या.
भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य राजकीय संघटनांशी संलग्न पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले. मोर्चात सात हजारावर नागरिक सहभागी झाल्याचा तर पाेलिसांनी तीन हजार उपस्थितीचा दावा केला. हिंदू जनजागृती समितीने या मोर्चाचे नेतृत्व केले. डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे ध्वज घेऊन ‘हर हर महादेव’च्या गजरात शिवतीर्थ मैदानापासून मोर्चास सुरुवात झाली. हिंदू संस्कृतीचे महत्व सांगणारा चित्ररथ अग्रभागी होता. पुरूषांबरोबरच महिलांची संख्या उल्लेखनीय दिसून आली. रणरागिणी महिला पथकासह कीर्तनकार, उद्योजक, संत, महंत, धर्माचार्य, पुरोहित, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माेर्चात सहभागी झाले. सकल जैन, माहेश्वरी सभा, बहुभाषिक ब्राम्हण संघ, योग वेदांत समिती, स्वामी समर्थ संप्रदाय, गायत्री परिवार, इस्कॉन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, राजपूत करणी सेना, हिंदू विधीज्ञ परिषद, शिवप्रतिष्ठानसह अन्य विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोर्चातील सर्व विषय मुख्यमंत्र्यापुढे मांडून त्यावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. वरसाडेकर महाराज, हिंदू जनजागृती समितीचे प्रदेश संघटक सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे, गोरक्षक संजय शर्मा ( धुळे), गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, अपूर्वा राका यांनी मनोगत व्यक्त केले. सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, स्वरुप लुंकड, संजीव शर्मा, प्रशांत जुवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले. मोर्चासाठी एका मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. मला खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा... काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री पाटील यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर निशाणा साधला.
दाेन मागण्या पटलावर; मंत्र्यांकडून मिळाले आश्वासन
शनिवारी माेर्चेकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारले. यावेळी पालकमंत्र्यांनी लव्ह जिहाद व धर्मांतर कायदा बनवण्याचा व गाेवंश हत्या या दाेन मागण्या पटलावर असून त्या अधिवेशनात मंजूर हाेतील असे ते म्हणाले.
गाेवंश तस्करी : जिल्हा दाेन राज्य व चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणावर गाेवंश तस्करी हाेते. त्याच्या विराेधात कायदा असून त्याची कठाेरपणे अंमलबजावणी हाेत नाही. त्यात भुसावळहून नशिराबाद येथे हाेणाऱ्या गाेवंश तस्करीबाबत पाेलिसांना हिंदू जनजागृती समितीने निवेदन दिले आहे. असे प्रकार महिन्यात किमान १५ ते २० वेळा हाेतात असा दावा समितीचा आहे. गाेवंश सरंक्षणासाठी समिती नेमा.
समितीचे म्हणणे असे
लव्ह जिहादबद्दल स्वतंत्र कायदा नसल्याने याबाबत जिल्ह्यात अशाप्रकारच्या गुन्ह्याची स्वतंत्र नाेंद नाही. अनेकदा आंतरधर्मीय विवाह पालकांच्या संमतीविना झालेले असताना पुढे काही प्रकरणात त्याला कुटुंबाकडून मान्यता मिळते; परंतु त्रास झाल्यास अशीच प्रकरणे पुढे येतात. त्यातही काैटुंबिक अत्याचार या प्रकारातील गुन्हा दाखल हाेतात . गेल्या वर्षी एका पाेलिस कर्मचाऱ्याच्या व महिनाभरापूर्वी एका महिला पाेलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्याबाबतचे प्रकार समाेर आले नंतर ते मिटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.