आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी मंदाकिनी 22 पटीने श्रीमंत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसेंपेक्षा त्यांच्या पत्नी तथा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे २२ पटीने श्रीमंत आहेत. खडसेंकडे १.१० कोटींची तर मंदाकिनी खडसेंकडे २२.२२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या आठ वर्षांत खडसेंच्या नावे असलेली संपत्ती ८४.७९ टक्क्यांनी घटली असून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली संपत्ती ५५.४३ टक्क्यांनी, हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे असलेली संपत्ती ९८.५१ टक्क्यांनी वाढली आहे. खडसे कुटुंबाची २०१४ मधील १७ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती २०२२ मध्ये ३६ कोटी १७ लाखांवर पाेहोचली आहे. त्यांच्या एकत्रित संपत्तीमध्ये गेल्या आठ वर्षांत ५१.९३ टक्के एवढी वाढ झाली आहे.

एकनाथ खडसेंनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्रदेखील सादर केले आहे. त्यात खडसेंच्या नावे जंगम आणि स्थावर अशी एकूण १ कोटी १० लाख ८६,१३४ रुपये, पत्नी मंदाकिनी खडसेंच्या नावे २२ कोटी २२ लाख ५६,४६७ रुपयांची तर हिंदू अविभक्त कुटुंबाच्या १२ कोटी ८३ लाख ७४,०२८ रुपयांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेच्या तुलनेत २०२२ च्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीमध्ये ५१.९३ टक्के वाढ झालेली आहे.

एकनाथ खडसे यांच्याकडे १.१० कोटी तर मंदाकिनी खडसेंकडे २२.२२ कोटींची संपत्ती; वार्षिक उत्पन्न ७५ लाखांवर असल्याची माहिती
पत्नीच्या नावे मालमत्ता
खडसेंच्या कुटुंबात सर्वाधिक मालमत्ता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या नावे आहे. त्यांच्याकडे एकूण २२ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यात ५६.६१ एकर शेतजमीन, मुक्ताईनगर, जळगाव, पुणे, मुंबई येथील प्लाॅट, फ्लॅट, गाेदाम, फार्महाऊससह भाेसरी येथील न्यायप्रविष्ट असलेल्या जागेचा समावेश आहे. हिंदू अविभक्त कुटुंबानुसार खडसेंच्या नावे २६.२४ एकर शेतजमिनीची नोंद आहे. परंतु वैयक्तिक केवळ त्यांच्याच नावे जमिनीची कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही.

पाच वर्षांतील उत्पन्न
२०१६-१७
१,८२,३८,१५२
२०१७-१८
१,०३,२४,४८५
२०१८-१९
९६,३५,१३९
२०१९-२०
१,०१,८४,१४७
२०२०-२१
७५,९८,९००

एकनाथ खडसे
२०१४ : ७२९०४३८३
२०२२ : ११०८६१३४
घट (८४.७९ टक्के)

मंदाकिनी खडसे
२०१४ : ९९०४७३५२, २०२२- २२२२५६४६७
वाढ (५५.४३ टक्के)

अविभक्त कुटुंब
२०१४ : १९०६६९६
२०२२- १२८३७४०२८ वाढ (९८.५१ टक्के)

आमदारकीच्या काळात ४७.६७ टक्के वाढ २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये खडसेंची संपत्ती ४७.६७ टक्के वाढली. २०१९ ते २०२२ या काळात त्यांची संपत्ती ८.१३ टक्के एवढी वाढली आहे.

एकूण संपत्ती
२०१४ : १७३८५८४३१
२०२२ : ३६१७१६६२९ वाढ (५१.९३ टक्के)

खडसेंच्या नावे वाहन नाही
माजी मंत्री खडसेंच्या नावे कोणतेही चारचाकी अथवा दुचाकी वाहन नाही. पत्नी मंदाकिनी खडसेंच्या नावे १९९० मधील एक जुनी जीप असून तिचे मूल्य २०१४ मध्ये ३० हजार तर २०२२ मध्ये ८५ हजार रुपये असल्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला आहे.

वार्षिक ७५ लाखांचे उत्पन्न
एकनाथ खडसेंनी आयकरासाठी पात्र असलेल्या उत्पन्नाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांचे २०२०-२१ या वर्षातील उत्पन्न १३०२३३० रुपये, मंदाकिनी खडसेंचे उत्पन्न ५३०८५८० रुपये तर हिंदू अविभक्त कुटुंबाचे उत्पन्न ९८७९९० असे एकत्रित ७५९८९०० रुपये दाखवले आहे. २०१९ -२० या कोराेनाकाळात खडसेंचे उत्पन्न १ कोटी १ लाख ८४ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...