आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजगारानिमित्त उदगीर (जि.लातूर) तालुक्यातून पुण्याला गेलेले गोपाळ रावण कोंघे (वय ६५) हा अशिक्षित मजूर पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात भरकटला. घर शोधत ते थेट रावेरला पोहोचले. येथे त्यांची भेट होमगार्ड सुहास चौधरी यांच्यासोबत झाल्यावर घाबरलेल्या कोंघे यांनी वढोनाचा रस्ता कोणता आहे? अशी विचारणा केली. यानंतर चौधरींनी सतर्कता दाखवल्याने कोंघे यांची कुटुंबीयांसोबत पुन्हा भेट झाली. भरकटलेल्या कोंघे यांच्यासोबत भेट झाल्यावर होमगार्ड चौधरींनी गृहरक्षक दलाचे समादेशक कांतीलाल तायडे यांना माहिती दिली. नंतर चौधरींनी गुगलवर वढोना कुठे आहे? हे सर्च केले. त्यात वढोना हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील गाव असल्याचे समजले. गुगल मॅपवर वढोनात महेश किराणा दुकानाचे लोकेशन मिळाले. यानंतर चौधरींनी दुकानदाराशी संपर्क साधून गोपाळ कोंघे या नावाच्या व्यक्तीबद्दल विचारणा केली.
मोबाइलमध्ये फोटो काढून दुकानदाराला पाठवला. दुकानदाराने कोंघेचे छायाचित्र गावातील सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकताच पुण्यातील कोंघेंच्या विनिता नावाच्या नातीने फोटो ओळखला. नंतर रावेरात होमगार्ड चौधरींना संपर्क करून संबंधित व्यक्ती आपले आजोबा आहेत. ते हरवल्याचे सांगितले.
कांतीलाल तायडे यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना कळवून नातेवाईक येईपर्यंत कोंघेंना आपल्याकडे ठेवण्याची परवानगी मागितली. उत्तम चौधरी यांनी जेवणाचा डबा दिला.गोपाळ कोंघे यांना कुटुबियांकडे सोपवताना एपीआय शीतलकुमार नाईक, कांतीलाल तायडे, सुहास चौधरी . अन् गोपाळ कोंघे यांना अश्रू झाले अनावर सोमवारी सकाळी गोपाळ कोंघे यांच्या पत्नी मंगलाबाई, मुलगी रेखा व नातजावई परमेश्वर शिंदे रावेरात आले. त्यांना पाहून गोपाळ कोंघे यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबकर्ता सुखरूप असल्याचे पाहून पत्नी व मुलगी गहिवरून गेल्या. नंतर पोलिसांनी गोपाळ कोंघे यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. एपीआय शीतलकुमार नाईक, होमगार्ड समादेशक कांतीलाल तायडे, होमगार्ड सुहास चौधरी उपस्थित होते. यावेळी रेखा यांनी रावेरातून झालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.