आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवे मारण्याची धमकी देत घरमालकाचा मोलकरणीवर अत्याचार:जळगाव शहरातील धक्कादायक घटना; पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठार मारण्याची धमकी देत घरमालकाने मोलकरणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पुंडलिक पाटील (रा. पहूर ता. जामनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात 48 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पिडीता घरात फरची पुसण्याचे काम करीत असतांना अचानकपणे प्रकाश पाटील याने जबरदस्ती तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी प्रकाश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

अमळनेर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत, गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील निंभोरा येथील तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला आरोपीपासून मुलगा झाला असून तिने मुलाचा परित्याग केल्याने बाळाला महिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने 2020 मध्ये अल्पवयीन मुलगी नववीला असताना, तू मला आवडते, आपण लग्न करू, दोघे पळून जाऊ, असे सांगितले. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे, असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने, तू माझ्याशी प्रेमसंबंध कर, अन्यथा तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरून मुलीने ‘हो’ म्हटल्यावर समाधान हा पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर, त्यांनी मुलीचा साखरपुडा 26 जुलै, 2012 रोजी एका तरूणासोबत करून दिला. ती 18 वर्षांची झाल्यानंतर लग्न करण्यात येणार होते. परंतू 9 नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याचे सांगीतले. मारवड पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार, समाधान पारधी यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...