आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला संकटांचा सामना करत पुढे जाताहेत. पुढे जाणाऱ्या महिलांच्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे. त्यांच्या कार्याच्या सुगंध सर्वत्र पसरत आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र, त्यांनी राजकारणातही स्वत:हून पुढे आले पाहिजे, असे उद््गार महापौर जयश्री महाजन यांनी ‘दिव्य मराठी’च्या नारिशक्ती सन्मान पुरस्कार साेहळ्यात काढले.
‘दिव्य मराठी’तर्फे शुक्रवारी दुपारी हाॅटेल सिल्व्हर पॅलेस येथे विविध क्षेत्रातील यशस्वी व कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी महिलांनी चूल व मूल यात न अडकता आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर विविध क्षेत्रातील यशस्वी ठरलेल्या या सर्व महिलांचा सन्मान महापौर महाजन, आयुक्त गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी हॉटेल सिल्व्हर पॅलेस व डीएमकेव्हीए मल्टिसोल्युशन यांचे विशेष सहकार्य मिळाले. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड संजीव पाटील उपस्थित होते. भाग्यश्री शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. ‘दिव्य मराठी’ने महिलांच्या कार्याचा केलेला सन्मान म्हणजे फार माेठे प्राेत्साहन आहे. या सन्मानाने महिलांना अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. इतरांनाही प्राेत्साहन मिळण्यास मदत हाेईल अशा भावना सन्मान स्वीकारण्याआधी या महिलांनी उत्स्फूर्तपणे यावेळी व्यक्त केल्या.
या महिलांचा झाला मान्यवरांच्याहस्ते सन्मान रेशमा पवार (मिसेस खान्देश), मनीषा मुंदडा (माहेश्वरी डेअरी फॉर्म संचालिका), वृषाली पांचोली (अप्सरा ब्यूटी पार्लर संचालिका), विजया खलसे (नगराध्यक्षा शेंदूर्णी), चंदा अग्रवाल (उपनगराध्यक्षा शेंदूर्णी), वैशाली सपकाळे (वैशाली फॅशन संचालिका), मीनल जैन (प्राचार्या किड्स गुरुकूल), गायत्री राणे (नगरसेविका), निना कटलर (प्राचार्या ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ), मंगला बेंडाळे (कुशल ऑफसेट, संचालिका), छाया पाटील (वेदिकस इंटरनॅशनल), ख्याती जोशी (माहीवे संचालिका), भारती कुमावत (जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्र), मनीषा चौधरी (नगराध्यक्षा, चोपडा), सीमा पाटील (आदर्श शिक्षिका), सुजाता झंवर (केएमसी ऑइल संचालिका), समीक्षा पाटील (नगरसेविका भडगाव), उषाराणी देवगुणे, डॉ. पूनम पाटील (समाजसेविका), संगीता घोडगावकर (इनव्हील क्लब पास्ट डिस्ट्रिक चेअरमन) या महिलांचा गौरव करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.